MBBS BDS admission 2026 : एमबीबीएस, बीडीएसच्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ विद्यार्थ्यांना प्रवेश

एमबीबीएसचे ८८.९३ टक्के, तर बीडीएसचे ६२.४७ टक्के प्रवेश
MBBS BDS admission 2026
MBBS BDS admission 2026pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : एमबीबीएस आणि बीडीएस पदवी अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत ९ हजार २६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दुसऱ्या फेरीसाठी एमबीबीएस आणि बीडीएसच्या मिळून ११ हजार १९६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ९ हजार २६५ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून १ हजार ९३१ जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागा आता तिसऱ्या केंद्रीभूत प्रवेश फेरीत उपलब्ध होणार आहेत.

अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस दुसऱ्या फेरीत ८ हजार ५७९ जागांपैकी ७ हजार ६३० जागांवर प्रवेश झाले असून प्रवेशाची टक्केवारी ८८.९३ आहे. राज्यातील ४२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या ४ हजार ९८० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४ हजार ८२५ जागांवर प्रवेश झाले असून १५५ जागा रिक्त आहेत.

MBBS BDS admission 2026
BEST Abhay Yojana 2026 : १६ हजार वीजग्राहकांनी बेस्टचे ३९ कोटी थकविले

२३ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ३ हजार १४९ जागांपैकी २ हजार ६२५ जागांवर प्रवेश झाले असून ५२४ जागा रिक्त आहेत. तसेच २ खासगी वैद्यकीय विद्यापीठांतील ४५० जागांपैकी १८० जागांवर प्रवेश झाले असून २७० जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे ६७महाविद्यालये व विद्यापीठांतील ८ हजार ५७९ एमबीबीएस जागांपैकी ७ हजार ६३० जागांवर प्रवेश झाले असून ९४९ जागा रिक्त आहेत.

बीडीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीत २ हजार ६१७ जागांपैकी १ हजार ६३५ जागांवर प्रवेश झाले आहेत. प्रवेशाची टक्केवारी ६२.४७ आहे. यामध्ये ५ शासकीय महाविद्यालयांतील ३१७ जागांपैकी २५४ जागांवर प्रवेश झाले असून ६३ जागा रिक्त आहेत. २३ खासगी महाविद्यालयांतील २ हजार २०० जागांपैकी १ हजार ३४६ जागांवर प्रवेश झाले असून ८५४ जागा रिक्त आहेत. तर एका खासगी विद्यापीठातील १०० जागांपैकी ३५ जागांवर प्रवेश झाले असून ६५ जागा रिक्त आहेत. राज्यातील २९ महाविद्यालये व विद्यापीठांतील बीडीएसच्या एकूण २ हजार ६१७ जागांपैकी १ हजार ६३५ जागांवर प्रवेश झाले असून ९८२ जागा रिक्त आहेत.

MBBS BDS admission 2026
BEST Abhay Yojana 2026 : १६ हजार वीजग्राहकांनी बेस्टचे ३९ कोटी थकविले

दरम्यान, दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या तिसऱ्या केंद्रीभूत प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्याच दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

  • तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचे वर्गीकरण ६ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरता येईल. तिसऱ्या फेरीची निवड यादी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news