मुंबई ः महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. 288 पैकी महायुतीने 215 ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूक महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत.
महायुतीचे सर्वाधिक 215 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 120 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना 58 व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागा जिंकत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे 31, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) 10 व शिवसेना ठाकरे गटाचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत.
महाविकास आघाडीचा दारूण पराभव
राज्यातील एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल पाहता महाविकास आघाडीने सर्वच ठिकाणी आपटी खाल्ली आहे. आघाडीतील काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 31 नगराध्यक्ष निवडून आले. तर उद्धव सेनेला 9 ठिकाणी विजय मिळवता आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 ठिकाणी यश मिळाले आहे. आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने सर्वाधिक ठिकाणी नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे.
मराठवाड्यात महायुतीचे वर्चस्व
मराठवाड्यातील एकूण 52 नगरपालिका-पंचायतींचा निकाल हाती आला असून, भाजपने सर्वाधिक 16 ठिकाणी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे. त्याखालोखाल शिंदे सेनेचे 13 नगराध्यक्ष निवडून आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 11 ठिकाणी यश मिळाले. महाविकास आघाडीचा केवळ 8 ठिकाणी नगराध्यक्षपदी विजय मिळवता आला आहे.
नागपूर जिल्ह्यात भाजपची मुसंडी
नागपूर जिल्ह्यातील 27 पैकी सुमारे 22 नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदावर नाव कोरले आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या काटोल, सावनेर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनिल देशमुख आणि सुनील केदार यांना या निवडणुकीत विधानसभेनंतर पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. दुसरीकडे काटोल नगराध्यक्षपदी शेकाप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना देशमुख यांनी बाजी मारत भाजपला आश्चर्यचकित केले आहे. स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोलमधील निकाल हा आमच्यासाठी अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींचे निकाल रविवारी (दि.21) घोषित झाले असून, बारा पैकी सहा ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. काँग्रेसला दोन, तर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट प्रत्येक एका ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यशस्वी झाले आहेत. प्रहार पक्षाला एका ठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडीला एक नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे १९ नगराध्यक्ष
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतील एकूण 60 जागांपैकी 19 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिंदे सेनेचे 14 आणि राष्ट्रवादीचे 14 नगराध्यक्षांनी बाजी मारली. काँग्रेसला तीन ठिकाणी, उबाठाला एका ठिकाणी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला तीन ठिकाणी यश मिळाले. इतर जागांवर स्थानिक आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे.
चंदगड ः सुनील कावनेकर, भाजप
अनगर ः प्राजक्ता पाटील, भाजप
जामनेर ः साधना महाजन, भाजप
दोंडाईचा ः नयनकुमार रावल, भाजप
मेढा ः रूपाली वारागडे, भाजप
करमाळा ः मोहिनी सावंत,
करमाळा शहर विकास आघाडी
मलकापूर ः रश्मी कोठावळे, जनसुराज्य शक्ती पक्ष
हातकणंगले ः अजितसिंह पाटील, शिंदे सेना
औसा ः परवीन शेख,
राष्ट्रवादी अजित पवार
आटपाडी ः यू. टी. जाधव, भाजप
उरण ः भावना घाणेकर,
राष्ट्रवादी शरद पवार
पन्हाळा ः जयश्री पवार,
जनसुराज्य शक्ती पक्ष
तळेगाव ः संतोष दाभाडे, भाजप
मुखेड ः बालाजी खतगावकर,
शिंदे सेना
अलिबाग ः अक्षया नाईक, शेकाप
म्हसवड ः पूजा वीरकर, भाजप
फुलंब्री ः राजेंद्र ठोंबरे, उद्धव सेना
गंगापूर ः संजय जाधव,
राष्ट्रवादी अजित पवार
अंबाजोगाई ः नंदकिशोर मुंदडा
कळमनुरी ः आश्लेषा चौधरी,
शिंदे सेना
वाई ः अनिल सावंत, भाजप
जिंतूर ः प्रताप देशमुख, भाजप
पालघर ः उत्तम घरत, शिंदे सेना
तासगाव ः विजया पाटील, स्वाभिमानी विकास आघाडी
जेजुरी ः जयदीप बारभाई,
राष्ट्रवादी अजित पवार
उरूण ईश्वरपूर ः आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादी शरद पवार
इंदापूर ः भरत शाह,
राष्ट्रवादी अजित पवार
मैंदर्गी ः अंजली बाजारमठ, भाजप
मालवण ः ममता वराडकर,
शिंदे सेना
पाचगणी ः दिलीप बगाडे,
राष्ट्रवादी अजित पवार
सावंतवाडी ः श्रद्धाराजे भोसले, भाजप
कणकवली ः संदेश पारकर, शहरविकास आघाडी
गेवराई ः गीता पवार, भाजप
भोर ः रामचंद्र आवारे,
राष्ट्रवादी अजित पवार
गंगाखेड ः उर्मिला केंद्रे,
राष्ट्रवादी अजित पवार
अक्कलकोट ः मिलन कल्याणशेट्टी, भाजप
रोहा ः वनश्री शेडगे,
राष्ट्रवादी अजित पवार
विटा ः काजल म्हेत्रे, शिंदे सेना
वडगाव मावळ ः अबोली ढोरे, राष्ट्रवादी अजित पवार
पेण ः प्रीतम पाटील, भाजप
सासवड ः आनंदी जगताप, भाजप
मंगळवेढा ः सुनंदा आवताडे, भाजप
तुळजापूर ः पिंटू गांगणे, भाजप
चिपळूण ः उमेश सकपाळ,
शिंदे सेना
खेड ः माधवी बुटाला, शिंदे सेना
राजापूर ः हुस्नबानू खलिपे, काँग्रेस
धर्माबाद ः संगीता बोलमवार, मराठवाडा जनहित पार्टी
बिलोली ः संतोष कुलकर्णी, मराठवाडा जनहित पार्टी
कुंडलवाडी ः कोटलवार, भाजप
डहाणू ः राजेंद्र माच्छी, शिंदे सेना
वैजापूर ः दिनेश परदेशी, भाजप
पैठण ः विद्या कावसानकर,
शिंदे सेना
सिल्लोड ः समीर सत्तार, शिंदे सेना
कन्नड ः शेखर फरीन बेगम, काँग्रेस
माथेरान ः चंद्रकांत चौधरी,
शिंदे सेना
बुलढाणा ः पूजा गायकवाड,
शिंदे सेना
चांदूर ः प्रियंका विश्वकर्मा,
आपलं चांदूर पॅनेल
खुलताबाद ः आमीर पटेल, काँग्रेस
महाबळेश्वर ः सुनील शिंदे,
राष्ट्रवादी अजित पवार
खोपोली ः कुलदीपक शेंडे,
शिंदे सेना
तिरोडा ः अशोक असाटी, भाजप
पारोळा ः चंद्रकांत पाटील,
शिंदे सेना
गडचिरोली ः ॲड. प्रणोती निंबोरकर, भाजप
आरमोरी ः रुपेश पुणेकर, भाजप
देसाईगंज ः लता सुंदरकर, भाजप
नंदुरबार ः रत्ना रघुवंशी, शिंदे सेना
शहादा ः अभिजित पाटील,
शहर विकास आघाडी
तळोदा ः योगेश चौधरी,
राष्ट्रवादी अजित पवार
नवापूर ः जयवंत जाधव,
राष्ट्रवादी अजित पवार
सालेकसा ः विजय फुंडे, काँग्रेस
खामगाव ः अपर्णा फुंडकर, भाजप
दारव्हा ः सुनील चिरडे, शिंदे सेना
ढाणकी ः अर्चना कांतावासमवार, उद्धव सेना
पुसद ः मोहिनी नाईक,
राष्ट्रवादी अजित पवार
उमरखेड ः तेजश्री जैन, काँग्रेसप्रणित आघाडी
नेर ः सुनीता जयस्वाल, शिंदे सेना
आर्णी ः नालंदा भरणे, काँग्रेस
घाटंजी ः परेश कारिया, काँग्रेस
पांढरकवडा ः आतिश बोरेले, भाजप
काटोल ः अर्चना देशमुख, शेकाप
डिगडोह देवी ः पूजा उके, भाजप
नरखेड ः मनोज कोरडे, भाजप
सावनेर ः संजना मंगळे, भाजप
कळमेश्वर ः अविनाश माकोडे, भाजप
रामटेक ः बिकेंद्र महाजन, शिंदे सेना
पाचोरा ः सुनीता पाटील, शिंदे सेना
जयसिंगपूर ः संजय यड्रावकर,
शाहू विकास आघाडी
मुरगूड ः सुहासिनी पाटील,
शिंदे सेना
कागल ः सविता माने,
राष्ट्रवादी-शाहू आघाडी
वडगाव ः विद्याताई पोळ,
काँग्रेस पुरस्कृत
शिरोळ ः योगिता कांबळे,
शिवशाहू आघाडी
पन्हाळा ः जयश्री पोवार,
जनसुराज्य पक्ष
गडहिंग्लज ः महेश तुरबतमठ, राष्ट्रवादी अजित पवार
कुरुंदवाड ः मनीषा डांगे,
शाहू आघाडी
मलकापूर ः रश्मी कोठावळे, जनसुराज्य
हातकणंगले ः अजितसिंह पाटील, शिंदे सेना
हुपरी ः मंगलराव माळगे, भाजप
आजरा ः अशोक चराटी,
ताराराणी आघाडी
वरूड ः ईश्वर सलामे, भाजप
मोर्शी ः प्रतीक्षा गुल्हाने, शिंदे सेना
धारणी ः सुनील चौथमल, भाजप
चिखलदरा ः अब्दूल शेख हैदर, काँग्रेस
अचलपूर ः रूपाली माथने, भाजप
अंजनगाव सुर्जी ः अविनाश गायगोले, भाजप
दर्यापूर ः मंदाकिनी भारसाकडे, काँग्रेस
शेंदूरजना घाट ः हरिभाऊ वरखडे, भाजप
धामणगाव रेल्वे ः अर्चना रोटे, भाजप
नांदगाव खंडेश्वर ः प्राप्ती मारोटकर, उद्धव सेना
चांदूर बाजार ः मनीषा नांगलिया, प्रहार
जामखेड ः प्रांजल चिंतामणी, भाजप
श्रीरामपूर ः करण ससाने, काँग्रेस
नेवासा ः डॉ. करणसिंह घुले,
शिंदे सेना
राहता ः स्वाधीन गाडेकर, भाजप
संगमनेर ः डॉ. मैथिली तांबे, संगमनेर सेवा समिती
शिर्डी ः जयश्री थोरात, भाजप
श्रीगोंदा ः सुनीता खेतमाळीस, भाजप
पाथर्डी ः अभय आव्हाड, भाजप
राहुरी ः भाऊसाहेब मोरे, मविआ
शेवगाव ः माया अरुण मुंडे,
शिंदे सेना
कोपरगाव ः पराग संधान,भाजप
देवळाली ः सत्यजित कदम, भाजप