Covid 19 (File Photo)
मुंबई

Maharashtra Corona News | कोरोनाचे राज्यात 59, तर मुंबईत 20 नवे रुग्ण

Mumbai New COVID Cases | सोमवारी राज्यात कोरोनाचे 59 तर मुंबईत 20 नवे रुग्ण आढळले.

पुढारी वृत्तसेवा

Coronavirus Maharashtra

मुंबई : मे महिन्यात राज्यभर आढळलेल्या रुग्णांची संख्या 477 वर पोहोचली असून, आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला आहे.

सोमवारी ठाणे महापालिकेत 4, पुणे 1, पुणे मनपा 17 , सातारा 2, कोल्हापूर 2, सांगली 1, छत्रपती संभाजीनगर 1,छत्रपती संभाजीनगर 7, चिंचवड महापालिकेत 2 असे नवीन रुग्ण आढळले.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत 12011 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 873 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत एकूण 359 रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 494 वर पोहोचली आहे.

पुणे : सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले होते. ऑक्सिजन प्रकल्पांची कार्यक्षमता तपासण्यासाठी मॉक ड्रिल करा आणि संसर्गात वाढ झाल्यास बेड राखीव ठेवा, असे आदेश राज्याच्या आरोग्य सचिवांकडून महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.

सध्या कोरोना विषाणूचे जेएन 1, एक्सएफजी आणि एलएफ 7.9 व्हेरियंट सक्रिय आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पीपीई किट, ऑक्सिजन प्रकल्प, आयसोलेशन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या तपासावी आणि बेड सज्ज ठेवाव्यात, ऑक्सिजनची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल करणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

कोविडचा आढावा

दरम्यान, मुंबईचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी आरोग्य खाते, मुंबई महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन मुंबईतील कोरोना रुग्णस्थितीचा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरुपाचे आजार आहेत त्यांनी मास्क वापरण्याची गरज आहे, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT