30 new Corona patients found in Mumbai, 68 patients found in the state
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात शनिवारी कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण आढळून असून कोरोना रुग्णात किंचित घट झाली आहे. मुंबईत ३० रुग्ण आढळले आहेत.
राज्यभरात ६८ नवीन पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये मुंबईत ३०, ठाणे ग्रामीणमध्ये २, ठाणे महापालिकेत ८, नवी मुंबई १, कल्याण-डोंबिवली १, रायगडमध्ये २, पुणे महापालिकेत १५ पिंपरी चिंचवड महापालिकेत ६ आणि नागपूर १ नवीन रुग्ण आढळले आहेत.
वसईच्या नायगाव परिसरातील रहिवाशी विजय किणी (४२) यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचा संशय आहे. मुंबईतील रहेजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचा मृतदेह राहत्या घरी न आणता मुंबईतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या, राज्य सरकार कोरोनाव्हायरससाठी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत १०,९१२ कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी ७४९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्याचप्रमाणे, आतापर्यंत एकूण २५७ रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या ४८५ वर पोहोचली आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात २३ रुग्णा कोरोना पॉझिटिव्ह आजपर्यंत मिळून आले आहेत. आज शनिवारी आणखी नवीन दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. १३१ रुग्णांची आरटीपीसीआर तर १४० रुग्णांची कोव्हिड १९ टेस्ट करण्यात आली होती. आठ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पाचपट वाढले असून ती ३,३९५ च्या घरात पोहोचली आहे. आजघडीला केरळमध्ये सर्वाधिक १,१४७ सक्रिय रुग्ण असून, त्यानंतर महाराष्ट्र (४२४), दिल्ली (२९४) आणि गुजरात (२२३) आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४८ रुग्ण आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २६ मे रोजी १,०१० रुग्ण होते, जे ३० मेपर्यंत २,७१० वर गेले.