Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात येत्या २४ तासात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ पट्ट्यात अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. याचबरोबर अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी सुमेर २०० मिलीमीटर पावसाची देखील शक्यता आहे.
हवामान विभागाने उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्याच्या घडीला कोणता विशेष अलर्ट नाहीये. हवामान विभागाने नागरिकांना दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आणि गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.