MLC Election Mahayuti Rift pudhari
मुंबई

MLC Election Mahayuti Rift: मित्रपक्षाची साथ सुटली, महायुतीला फटका; भाजपचा शिवसेनेवर ठपका!

BJP Vs Shiv Sena Eknath Shinde: पुण्यात पाठिंबा दुसऱ्याला, संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार; भाजपचा शिवसेनेला सवाल!

Anirudha Sankpal

MLC Election Mahayuti Rift: महाराष्ट्रात नुकतेच ५ विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. तब्बल ४८ तास लांबलेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीने ५ पैकी ३ जागांवर विजय मिळवलात तर महायुतीला फक्त २ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर महायुतीमध्ये या निवडणुकीमध्ये झालेली बंडाळी आणि एकमेकांच्या उमेदवरांचा काटा काढण्याच्या स्पर्धेवर भाजप नाराज असल्याचं दिसून येत आहे.

भाजप विरोधात खुला प्रचार

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ट्विट करून शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीत अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजप विरोधातील उमेदवराचा खुला प्रचार केला. तसेच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती म्हणत आपला उमेदवार उभा केला होता. यावरून आता भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीच्या एकजुटीला धक्का

नवानथ बन आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, 'शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.'

तर पाचही जागा जिंकल्या असत्या

नवनाथ बन यांनी शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला असता आणि भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहकार्य केलं असतं तर पाचही जागांवर महायुकीचा विजय झाला असता असा दावा देखील केला. ते म्हणाले, 'पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT