मुंबई : घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 19 वर्षांच्या आरोपी प्रियकराला आंबोली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून लवकरच मेडीकल होणार आहे.
49 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात राहत असून पिडीत तिची मुलगी आहे. याच परिसरात आरोपी राहत असून त्याचे पिडीत मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत तिच्या घरी कोणीही नसताना आरोपी तिच्या घरी येत होता. तिच्यावर जबदस्तीने लैगिंक करुन त्याने तिचे काही अश्लील व्हिडीओ बनविले होते. तिने हा प्रकार कोणालाही सांगितला किंवा त्याच्या सांगण्याप्रमाणे वागली नाही तर तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
अलीकडेच हा प्रकार पिडीत मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. त्यानंतर तिने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अतचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.