Legislative Council Deputy Chairman Pudhari
मुंबई

Legislative Council Deputy Chairman: विधान परिषद उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर

शिंदे शिवसेनेकडे पद : गोऱ्हे यांच्या निवडीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. सभापती राम शिंदे सोमवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करतील. विधान परिषदेत सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून शिवसेना शिंदे गटाकडे उपसभापतिपद दिले जाण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ मागील महिन्यात संपला होता. तव्हापासून हे पद रिक्त आहे. गेल्या महिन्यात विधान परिषद सदस्य निवडीत नीलम गोऱ्हे या शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या.

उपसभापतिपदी पुन्हा गोऱ्हे यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. महायुतीच्या सत्तावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद, विधान परिषद सभापतिपद भाजपकडे तर विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे सभागृहात पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे मविआकडून उपसभापतिपदासाठी उमेदवार दिला जाणार की बिनविरोध निवड पार पडणार, याबाबत उत्सुकता आहे.

उपसभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, माघार आणि प्रत्यक्ष मतदान अथवा बिनविरोध निवडीची प्रक्रिया पार पडेल.

विधान परिषदेतील संख्याबळ

भाजप : ३५

शिवसेना (शिंदे गट) : १२

राष्ट्रवादी (अजित पवार) : १०

शिवसेना (ठाकरे गट) : ०६

काँग्रेस : ०५

राष्ट्रवादी (शरद पवार) : ०२

अपक्ष : ०३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT