मुंबई : राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता असल्यामुळे हे अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबतच्या सूचना मंत्रालयीन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे घेण्यात येते. यावर्षी 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, 31 जानेवारी 2026 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांसाठी आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.