मुंबई: राज्यात उष्णतेच्या लाटेत 26 एप्रिलपर्यंत उष्माघाताची रुग्णसंख्या 55 वर पोहोचली आहे. मंगळवारी धुळे जिल्ह्यात सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली आणि दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
संपूर्ण महाराष्ट्र वैशाख वणव्यात होरपळत असून आरोग्य विभागाने राज्यभर सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. उष्माघाताच्या उपचारांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.
उष्माघाताचे नंदूरबार येथे सर्वाधिक 14 रुग्ण आढळले तर नाशिकला 6 रुग्णांची नोंद झाली. गडचिरोली व रत्नागिरी येथे प्रत्येकी 4 रुग्ण आढळले. अहिल्यानगरमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली. बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जालना, पालघर, पुणे व रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. अकोला, अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर व ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण नोंदवण्यात आला आहे.