Maharashtra Politics: बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती आज सेनेत विलीन? परिषदेची उमेदवारी निश्चित

विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsPudhari
Published on
Updated on

मुंबई: विधानपरिषदेच्या उमेदवारीची अट म्हणून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन केला जाणार आहे. बुधवारी दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत तशी घोषणा बुधवारी स्वतः बच्चू कडू करतील आणि त्यासोबतच त्यांची विधान परिषदेची उमेदवारी एकनाथ शिंदे जाहीर करतील असे समजते.

Maharashtra Politics
Marathi Mandatory: १ मे पासून मराठी सक्तीची मोहीम, मात्र कारवाई नाही; परिवहन मंत्र्यांची नरमाईची भूमिका

विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारावर शिवसेनेचे दोन सदस्य निवडून जाणार आहेत.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने अनेक धक्के दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे. त्या दृष्टीनेच बच्चू कडू यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्याची चर्चा त्यांनी सुरू केली.

Maharashtra Politics
Kanjurmarg Dumping Ground: कांजूरमार्ग डम्पिंगचे मिथेन उत्सर्जन कसे रोखणार?

बच्चू कडू हे पश्चिम विदर्भातील आक्रमक नेते आहेत. अमरावतीसह अन्य काही जिल्ह्यात त्यांचे चांगले नेटवर्क आहे. बच्चू कडू यांना परिषदेची उमेदवारी देताना त्यांनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी अट ठेवण्यात आली होती. अखेर आपला पक्ष शिवसेनेत विलीन करण्यास बच्चू कडू तयार झाल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news