Chandrashekhar Bawankule Pudhari
मुंबई

New Revenue Offices : राज्यात लवकरच ८८ नवीन महसूल कार्यालये

नागरिकांचा प्रवास टळणार, हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची सूचना जारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये १० अपर जिल्हाधिकारी कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये, २ तहसील कार्यालये आणि ६९ अपर तहसील कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांबाबत हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना देऊन हरकतींचा एकत्रित अहवाल १२ जुलै २०२६ पर्यंत सादर केला जाणार आहे.

नागरिकांना विविध दाखल्यांसाठी किंवा सरकारी कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील हरकतींवर काम पाहण्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. अपर तहसील कार्यालयांसंदर्भातील संपूर्ण काम उपविभागीय अधिकारी पाहतील.

येथे होणार अपर जिल्हाधिकारी कार्यालये

कल्याण (ठाणे), दापोली (रत्नागिरी), बारामती (पुणे), फलटण (सातारा), पंढरपूर (सोलापूर), किनवट (नांदेड), अचलपूर (अमरावती), पुसद (यवतमाळ), खामगाव (बुलढाणा) आणि नागपूर (ग्रामीण).

नवीन उपविभागीय कार्यालये

मुंबई शहर फोर्ट, मुंबई उपनगर बोरिवली, शहापूर (ठाणे), देवगड (सिंधुदुर्ग), साक्री (धुळे), जामनेर (जळगाव) आणि सिन्‍नर (नाशिक).

नवीन अपर तहसील कार्यालये

मुंबई उपनगरातील चेंबूर, मालाड, वांद्रे, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, बेलापूर, पुणे जिल्ह्यातील चाकण आणि नाशिकमधील लासलगाव व सिन्‍नर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि त्यांच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवीन महसूल कार्यालयांची निर्मिती करण्यात येत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT