Devendra Fadanvis Pudhari
मुंबई

Maharashtra Drought: दुष्काळमुक्तीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

जलसंधारणविषयक बैठकीत विभागांना निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत.

पानी फाऊंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणेने विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उत्तम नेतृत्व व कार्यक्षमता दाखविली आहे. अडचणीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा उत्साहाने आणि जबाबदारीने कामाला लागल्यास कामाचा वेग वाढतो, हे आपण अनुभवले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेपासून काम सुरू असल्याचे चित्र यापूर्वी दिसले आहे. त्याच कार्यतत्परतेने आणि समर्पित भावनेने आता जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT