Daily COVID Count Maharashtra
मुंबई : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून दैनंदिन रुग्णसंख्येने शंभरी पार केली. यावर्षी राज्यात शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण मिळाले आहेत. शुक्रवारी राज्यात 114 तर मुंबईत 37 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकाचा मृत्यू झाला.
राज्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी मुंबईत 37, पुणे महापालिकेत 42, ठाणे महापालिकेत 1, नवी मुंबई 4, मीरा भाईंदर महापालिकेत 7 , कल्याण डोबिवली 3, पुणे जिल्हा 2, पिंपरी चिंचवडमध्ये 6 , सातारा 1, कोल्हापूर मनपाण1, सांगली मनपा 1, छत्रपती संभाजीनगर 1 आणि परभणी महापालिकेत 1 रुग्णांची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्व रुग्ण सौम्य लक्षणांसह असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत.
सध्या राज्यात एकूण 577 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात 15510 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 1276 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 681 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 577 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, नवी मुंबईत शुक्रवारी 34 कोरोना चाचण्या करण्यात आल्या व त्यापैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. परिणामी, नवी मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 42 झाली आहे.