सीईटी नोंदणीत यंदा दुबार संधीमुळे वाढ pudhari photo
मुंबई

CET 2026 registration : सीईटी नोंदणीत यंदा दुबार संधीमुळे वाढ

24 मार्चपासून परीक्षांना सुरुवात; 17 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी-2026 परीक्षांच्या नोंदणीत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे.

11 मार्चपर्यंत तब्बल 17 लाख 40 हजार 927 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या 14 लाख 7 हजार 100 विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा डबल परीक्षेच्या संधीमुळे नोंदणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 24 मार्चपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण आणि कला शिक्षण या सहा विभागांअंतर्गत सुमारे 20 विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमां साठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या आधारे 73 अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. राज्यातील 5 हजार 700 हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातात.

यंदा सुमारे 17 लाख विद्यार्थी सीईटी देण्यासाठी अर्ज भरला आहे. यामुळे राज्यातील सीईटी सेलच्या पूर्व परीक्षांच्या व्यवस्थेची व्याप्ती आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः अभियांत्रिकी, फार्मसी आणि व्यवस्थापन प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उचलला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT