CET Pudhari
मुंबई

CET 2026-27 : प्रवेशपूर्व परीक्षांसाठी 17 लाखांवर अर्ज

सोमवारपर्यंत 17 अभ्यासक्रमाच्या सीईटीला 12 लाख 28 हजार 213 विद्यार्थ्यांनी प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम तारखा संपत आल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत 17 अभ्यासक्रमाच्या सीईटीला 12 लाख 28 हजार 213 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली असून दोन संधी दिलेल्या अभ्यासक्रमांसह 16 लाख 58 हजार 979 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून होत असलेल्या तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या आठ, कला शिक्षण अंतर्गत असलेल्या एक, उच्च शिक्षण विभागाच्या अंगर्तत असलेल्या आठ अशा 17 व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी गट) या प्रवेश परीक्षेची मूळ अंतिम तारीख 24 फेब्रुवारी होती. आता विलंब शुल्कासह 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीसाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली.

बी. डिझाईन, बी.एड, एमएड, एमपीएड अभ्यासक्रमांसाठी 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करता येईल. बी.एस्सी नर्सिंग तसेच डीपीएन/पीएचएन अभ्यासक्रमांसाठी 25 फेब्रुवारी ते 16 मार्च पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. दोन संधींचा विचार करता एकूण 16 लाख 58 हजार 979 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. पीसीएम समूहाच्या नोंदणीत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. 2025 मध्ये 4 लाख 64 हजार 263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

असे आहे सुधारित वेळापत्रक

  • एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) : 25 ते 27 फेब्रुवारी 2026 (विलंब शुल्कासह

  • बी.एस्सी नर्सिंग : 25 फेब्रुवारी ते 16 मार्च

  • डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) : 25 फेब्रुवारी ते 16 मार्च

  • बी. डिझाईन : 25 ते 27 फेब्रुवारी (अंतिम मुदतवाढ)

  • बी.एड, एमएड, एमपीएड : 25 ते 27 फेब्रुवारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT