Mahalaxmi Express Smoke Incident Pudhari
मुंबई

Mahalaxmi Express Smoke Incident: मृत उंदरामुळे शॉर्टसर्किट; ‘महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेस’च्या डब्यात धूर

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कोल्हापूरहून मुंबईत येणाऱ्या ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’च्या बी-वन डब्यात मंगळवारी पहाटे कर्जत मंकी हिल येथे अचानक धूर येऊ लागल्याने एकच खळबळ माजली. घाबरलेल्या प्रवाशांनी धावपळ करून रेल्वे सुरक्षा यंत्रणांकडे संपर्क साधला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली होती. यात कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झालेला नाही. मात्र, ऐन पहाटे प्रवासी झोपेत असताना ही घटना घडल्याने गाडीतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने डब्याची तपासणी केली असता त्यांना विद्युत पॅनेलमध्ये मृत उंदरामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे धूर येत आल्याचे दिसून आले.

या प्रकाराने पहाटे ५.३० वाजता कर्जत स्थानकावर पोहोचणे अपेक्षित असलेल्या गाडीला तासाभराचा विलंब झाला. ६.१५ वाजता कर्जत स्थानकातून ही गाडी पुढे रवाना करण्यात आल्याचे कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण मटकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT