Madh Versova Bridge pudhari photo
मुंबई

Madh Versova Bridge : मढ-वर्सोवा जेट्टी पूल दोन वर्षांत येणार मुंबईकरांच्या सेवेत

दीड तासाचा प्रवास १५ मिनिटांत; ३ हजार ९९० कोटींचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मढ-वर्सोवा जेट्टी केबल-स्टेड (तारांवर आधारलेला) पूलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने नियोजन केले आहे. २०२८ अखेरपर्यंत हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असून दीड तासाचा प्रवास १५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी ३ हजार ९९० कोटी रुपये खर्च येणार आहे.

मालाड पश्चिमेकडील मढ येथील रहीवाशांना अंधेरी येथे जाण्याकरिता व्हाया लिंक रोड गाडीने अंदाजे १८.६ किमीचे अंतर पार करावे लागते. याला साधारणतः सुमारे दीड तासाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी मढ व वर्सोवा दरम्यान असणाऱ्या वर्सोवा खाडीवर पूल बांधण्याकरिता वांरवार मागणी केली होती.

परंतु सध्या वर्सोवा ते मढ दरम्यान फेरी बोट सुरू असून व्हेरी बोट चालवणाऱ्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीला या प्रकल्पाला कोळी बांधवांचा विरोध होता. परंतु हा विरोध आता मावळला असून पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

पुलाच्या बांधकामामुळे प्रवासाची लांबी १८.६ किमीवरुन ५ किमीपर्यंत कमी होणार आहे. तर प्रवासाचा वेळ १ तास ३० मिनिटावरुन १५ ते २० मिनिटापर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधन व वेळेची बचत, पर्यावरणाची हानी टळणार आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

  • २,०६४ मीटर (२.०६ किमी) पूलाची लांबी अंदाजे

  • ३९९० कोटी अंदाजित खर्च

  1. सध्या वर्सोवा ते मढ जाण्यासाठी लोखंडवाला, लिंक रोड, मालाडमार्गे १८.६ किमीचा वळसा घालावा लागतो. ज्यासाठी एक ते दीड तास लागतो. हा पूल सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ५ ते १० मिनिटांत पूर्ण होईल.

  2. ४ लेनचा केबल-स्टेड पूल मालाड खाडीवरून मढ जेट्टी आणि वर्सोवा (फिशरीज युनिव्हर्सिटी रोड - वर्सोवा पॉकेट) यांना जोडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT