Central Railway Pudhari
मुंबई

Mumbai Local Train: CSMT स्टेशनला अनर्थ टळला; दोन लोकल आमनेसामने, स्टेशन मास्तर निलंबित, वाहतुकीची सद्यस्थिती वाचा

what happened at csmt today: एकाच फलाटावर दोन लोकल गाड्या आमनेसामने आल्याचा गंभीर प्रकार समोर

पुढारी डिजिटल टीम

mumbai local train csmt news in marati

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर मंगळवारी अनर्थ टळला. एकाच फलाटावर दोन लोकल गाड्या आमनेसामने आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून मध्य रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. या हलगर्जीपणामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.

बदलापूरहून येणारी लोकल फलाट क्रमांक 4 वर घेण्यात येणे अपेक्षित होते; मात्र सिग्नल चुकीच्या दिल्याने ती लोकल फलाट क्रमांक 5 कडे वळली. तिथे आधीच एक लोकल ट्रेन थांबली होती. दोन ट्रेन समोरासमोर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मोटरमनला चुक लक्षात येताच त्याने लोकल ट्रेन थांबवली.

घटनेनंतर त्वरित लोकल मागे घेण्यात आली. मात्र, या गोंधळामुळे फलाट क्रमांक 5 ते 8 पर्यंतची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली. दुपारी 3.18 पासून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली होती.

दरम्यान, याच काळात कल्याण ते सीएसटी दरम्यान धावणारी जलद लोकल मज्जीद बंदर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे थांबवावी लागली. गाडी अचानक थांबल्याने काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत स्थानक गाठल्याचे चित्र पाहायला मिळाले. गाड्या सुरक्षितपणे मागे घेतल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. ‘दोन गाड्यांमध्ये 230 मीटरचे अंतर होते. दोन गाड्या समोरासमोर नाही. 20 ते 25 मिनिटे लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता'.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली असून चुकीचा सिग्नल दिल्याप्रकरणी सीएसएमटी स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT