Lalbaug Raja News Pudhari
मुंबई

Lalbaug Raja News: महिला पोलिसाशी हुज्जत घालून अश्‍लील शिवीगाळ; दोघांविरुद्ध गुन्हा

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना महिला पोलिसाशी हुज्जत आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. सचिन सूर्यवंशी आणि नम्रता सूर्यवंशी यांच्याविरुद्ध काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुन गर्दी पांगविण्याचा प्रयत्न करणार्‍या एका महिला पोलीस शिपायाशी दोघांनी हुज्जत घालून अश्‍लील शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सचिन दशरथ सूर्यवंशी आणि नम्रता सचिन सूर्यवंशी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोटीस देऊन या दोघांनाही नंतर सोडून देण्यात आले आहे.

ताडदेव येथे राहणार्‍या शुभांगी बाळनाथ शेळके या महिला पोलीस शिपाई आहे. त्या दर्शनासाठी आलेल्या भक्तामना सूचना करत असताना संबंधितांनी महिला पोलिसांशी अश्लिल संभाषण करत शिवीगाळ केली.

अन्य एका घटनेत गर्दीचा फायदा घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल, वॉलेट चोरी करणार्‍या एका दुकलीस काळाचौकी पोलिसांनी अटक केली. आरिफ सकसेनसिंग गुज्जर आणि सोमनाथ समनसिंग राठोड अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मध्यप्रदेशच्या इंदौरचे रहिवाशी आहे.

प्राथमिक तपासात ते दोघेही चोरीच्या उद्देशाने मध्यप्रदेशातून मुंबईत आल्याचे उघडकीस आले आहे. मायकल बबलू नाडर हे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आले होते.

कुबल मसाला मुखदर्शन लाईनच्या दिशेने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील मोबाईलसह कॅश असा २७ हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. चोरीनंतर ते दोघेही पळून जात होते. यावेळी मायलकलसह इतर भाविकांनी पळून जाणार्‍या चोर चोर असा आरडाओरड करुन पाठलाग करुन शिताफीने पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT