Mumbai Lalbaug fire news file photo
मुंबई

Mumbai Lalbaug fire news: लालबागमध्ये इमारतीला भीषण आग; रहिवाशांची मोठी धावपळ, नेमकं काय घडलं?

लालबाग चिवडा गल्ली येथील पूनम बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

मोहन कारंडे

Mumbai Lalbaug fire news

मुंबई: लालबाग चिवडा गल्ली येथील पूनम बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामुळे तातडीने या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लालबागच्या चिवडा गल्लीतील पूनम बिल्डिंगला आग लागल्याची माहिती मिळताच बिल्डिंगमधील रहिवाशांची चांगलीच धावपळ उडाली. आग दहाव्या मजल्यावर असल्यामुळे इमारतीतील अनेक रहिवाशी सुरक्षित खाली उतरले. तोपर्यंत अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

यात मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य कोणत्या कारणामुळे याचा शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळकरांना वाहतूक कोंडी पासून सुटका

रस्त्यात अडथळा ठरणारे १३८ घरांवर मुंबई महानगरपालिका के/दक्षिण विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली. अंधेरी पूर्वेत मरोळ कदमवाडी ते मरोळ मरोशी रोड ला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला पालिकेकडून सुरुवात झाली आहे. मरोळ भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यापासून सुटका करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली आहे.

विलेपार्ले पूर्व येथील महात्मा गांधी मार्गावरील ६५० मीटर लांबीचा पदपथ अडथळामुक्त

पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी आवश्यक मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने, के दक्षिण विभागातील विलेपार्ले पूर्व येथील महात्मा गांधी मार्ग हा अधिक पादचारी वर्दळ असलेल्या पाच प्राधान्यक्रमाच्या मार्गांपैकी एक म्हणून निवडण्यात आला आहे. या मार्गावरील सुमारे ६५० मीटर लांबीचा पदपथ आज (दिनांक १८) अडथळामुक्त करून पादचाऱ्यांसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT