Konkan Railway Ticket Booking Pudhari
मुंबई

Konkan Railway Ticket Booking: कोकण रेल्वे गाड्या हाऊसफुल; उन्हाळी सुट्टीत तिकीटांसाठी प्रचंड गर्दी

कोकणकन्या, मांडवीसह सर्व गाड्यांचे आरक्षण बंद; वेटिंग तिकीटही संपल्याने प्रवाशांची अडचण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शाळा महाविद्यालयाला उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी कोकणवासियांनी आगाऊ रेल्वेचे आरक्षण केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या हाउसफुल झाल्या आहेत. कोकणकन्या एक्सप्रेससह सर्व प्रमुख एक्सप्रेस गाड्या रिग्रेट झाल्यामुळे वेटिंग तिकीटही आता मिळेनाशी झाली आहे.

गणेश चतुर्थी होळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून सुट्टीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोणत्याच गाडीचे तिकीट मिळत नाही. 15 एप्रिलनंतर बहुतांश शाळांना उन्हाळ्याची सुट्टी पडणार असल्यामुळे 16 एप्रिल ते संपूर्ण मे महिना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या हाउसफुल झाल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी येथून नियमित धावणाऱ्या कोकणकन्या, मांडवी व जनशताब्दी एक्सप्रेस व दादर येथून सुटणारी तुतारी एक्सप्रेस गाडी हाउसफुल झाले असून मे महिन्यातील आरक्षण रिग्रेट म्हणजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे वेटिंग तिकीट काढून तिकीट कन्फर्म होईल याच्या भरवशावर असलेल्या प्रवाशांना आता वेटिंग तिकीटही देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य व कोकण रेल्वे तर्फे उन्हाळ्यात ऐनवेळी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 1 मे ते 15 मे या 15 दिवसाचा आढावा घेतला असता कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी, एलटीडी मडगाव, बांद्रा मडगाव, मांडवी या गाड्यांचे वेटिंग तिकीट बंद करण्यात आले असून या सर्व गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. विशेष म्हणजे 01119 एलटीडी मडगाव विशेष गाडीचे 200 ते 250 वर पोहचले आहे.

कोकणात धावणाऱ्या गाड्या

20111 कोकणकन्या एक्सप्रेस : आरक्षण बंद

10103 मांडवी एक्सप्रेस : आरक्षण बंद

10115 बांद्रा मडगाव एक्सप्रेस : आरक्षण बंद

11099 एलटीटी मडगाव एक्सप्रेस : आरक्षण बंद

12051 जनशताब्दी एक्सप्रेस : आरक्षण बंद

11003 तुतारी एक्सप्रेस : आरक्षण बंद

01119 एलटीटी मडगाव स्पेशल : 200 ते 250 वेटिंग

10105 दिवा सावंतवाडी पॅसेंजर : 150 वेटिंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT