मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे.
शेल कंपन्यांकडून हसन मुश्रीफ यांचे चिरंजिव नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, किरिट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याविरोधात दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले…
– हसन मुश्रीफ आणि परिवाराचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक बेनामी व्यवहार.
– मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार देणार आहे. पुरावे सादर करणार आहे.
– मुश्रीफ पिता- पुत्रांनी १२७ कोटींचे बेनामी व्यवहार केले.
– मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती प्रकरणी मुश्रिफांवर कारवाई करावी.
– शेल कंपनीकडून मुश्रिफांच्या मुलानं २ कोटीचं कर्ज घेतलं.
– मुश्रीफ यांच्याविरोधातील पुरावे आयकर विभागाला दिले.
– नाविद मुश्रीफ यांच्या खात्यात एका कंपनीकडून २ कोटीचा चेक जमा झाला.
– १२७ कोटींचा घोटाळा केल्याचे माझ्याकडे पुरावे.
– ठाकरे सरकारमध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार.
हसन मुश्रीफ का म्हणाले?