Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026:
कल्याण (सतीश तांबे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक १८ मधील अ ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ) या राखीव जागे करिता भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेखा राजन चौधरी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच राजकीय पक्षा सह अपक्ष उमेदवारांचे या जागे करिता उमेदवारी दाखल न झाल्याने भाजपाच्या रेखा चौधरी यांनी बिनविरोध झाली आहे केवल या विजयाची औपचारिकरीत्या घोषणा उमेदवारी अर्ज छाननी नंतर जाहीर होणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ३१ पॅनल मधील १२२ जागा साठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी अखेरचा दिवस होता. १२२ जागा साठी प्रमुख सर्वच राजकीय पक्षासाठी अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पालिकेच्या कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक १८ मध्ये चार जागा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव असून या मध्ये १८ -अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, १८ -ब सर्वसाधारण महिला, १८ -क सर्वसाधारण व १८ - ड सर्वसाधारण अशा आहेत.
१८ अ या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी राखीव जागे करिता भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेखा राजन चौधरी यांच्या व्यतिरिक्त एका ही पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती जे- 4 प्रभाग क्षेत्र कार्यालयातील मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ४ चे निवडणूक निर्णायक अधिकारी वरून कुमार सहारे यांनी दिली.
त्यामुळे भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांची बिन विरोध निवड झाली असून त्याच्या विजयाची घोषणा उद्याच्या निवडणूक अर्ज छाननी अंती औपचारिकरीत्या करणे बाकी आहे.