मुंबई

वाहनातील बॅटरी चोरी करणाऱ्यांना कल्याण क्राईम ब्रांचकडून अटक

करण शिंदे

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली परिसरात वाहनांमधील बॅटऱ्या चोरीची प्रकरणे उघडकीस येत होती. त्यामुळे अशा प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची दखल घेत कल्याण युनिट क्राईम ब्रांचने दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

डोंबिवलीतील मशाल चौक ते शेलार चौक दरम्यानच्या भागात पार्क केलेल्या टेम्पोंच्या बॅटऱ्यांच्या चोरीमध्ये वाढ झाली होती. पोलिसांनी सापळा रचून सुहास उर्फ चिंग्या विजय पाईकराव (वय.21 रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलार नाका) आणि रॉकी उर्फ मोनू रमेश चव्हाण ( वय.18 रा. त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी, शेलार नाका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सुहास आणि रॉकी हे बॅटऱ्या चोरुन आणत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी प्रीमियर कॉलनीमध्ये जाळे लावून बसले होते. थोड्याच वेळात सुहास आणि हे गोण्यामध्ये अवजड सामान घेऊन रिक्षातून उतरले. पोलिसांनी त्यानंतर त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली. या चौकशीत त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपनीच्या मोठ्या बॅटरी चोरल्याचे उघडकीस आले.

या संदर्भात जमादार दत्ता भोसले, पोलिस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदीप चव्हाण, बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, मिथून राठोड यांच्यासह चालक बोरकर या पथकाने प्रीमियर कॉलनी मैदानाजवळ ही कारवाई केली. या संदर्भात टिळकनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT