Central Railway  Pudhari File Photo
मुंबई

Kalyan Badlapur Railway Block: कल्याण-बदलापूरदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक; काही लोकल फेऱ्या रद्द

काही धीम्या मार्गावर वळवण्यात येणार, चार एक्स्प्रेसचे मार्ग बदलले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वेकडून कल्याण ते बदलापूर दरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी शनिवार आणि रविवार (दि. २८/२९ नोव्हेंबर) च्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री १.४० ते पहाटे ३.४० वाजेपर्यंत (दोन तास) कल्याण आणि बदलापूर स्थानका दरम्यान 'अप' आणि 'डाऊन' मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.

या ब्लॉकमुळे मध्यरात्री कल्याण ते कर्जत दरम्यानची उपनगरीय रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ज्या गाड्यांना कल्याण येथे नियोजित थांबा आहे, त्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे स्थानकांवरही थांबा देण्यात येणार आहे.

सांताक्रूझ ते माहीमदरम्यान शनिवारी मध्यरात्री 'जम्बो ब्लॉक'

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवार रविवारच्या मध्यरात्री सांताक्रुझ ते माहीम स्थानका दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर चार तासांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

२८, २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अप जलद मार्गावर रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत, तर डाउन जलद मार्गावर रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल गाड्या अंधेरी आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकल (२८ नोव्हेंबर)

कर्जतसाठी : सीएसएमटीहून रात्री ११.३० वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत

बदलापूरसाठी : सीएसएमटीहून रात्री ११.५१ वाजता सुटणारी सीएसएमटी-बदलापूर लोकल

सीएसएमटीसाठी : बदलापूरहून रात्री ११.२९ वाजता सुटणारी बदलापूर-सीएसएमटी लोकल.

ब्लॉक कालावधीत खालील चार 'अप' एक्सप्रेस गाड्या कर्जत - पनवेल - ठाणे मार्गे वळवण्यात येतील n गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर - सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस

गाडी क्र. १८५१९ विशाखापट्टणम - एलटीटी एक्सप्रेस

गाडी क्र. १२७०२ हैदराबाद - सीएसएमटी एक्सप्रेस

गाडी क्र. १११४० होस्पेट - सीएसएमटी एक्सप्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT