Emmanuel Macron Mumbai Visit Pudhari
मुंबई

Emmanuel Macron Mumbai Visit: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना आवडली मुंबई; रस्त्यांवर जॉगिंग ते बॉलिवूड स्टार्ससोबत फोटोसेशन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा; दक्षिण मुंबईतील जॉगिंग, सिनेकलाकारांशी भेटीगाठींमुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घेतला. सकाळी मुंबईतील रस्त्यांवर मुक्तपणे जॉगिंग करत दुपारी मनोज वाजपेयी, शबाना आजमी, रिचा चढ्ढा अशा सिनेकलाकारांसह मनमोकळे फोटोसेशन करेपर्यंत मंगळवारी मॅक्रॉन मुंबईचा आनंद घेत होते.

भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मंगळवारी मुंबईत असल्यामुळे येथील काही मुख्य रस्ते बंद करण्यात आले होते. वाहतूक वळवली गेली होती. मात्र या विशेष पाहुण्यांचे आगत स्वागत अशी मुंबईकरांनीही मनापासून दखल घेतली होती. दक्षिण मुंबईत जागोजागी लागलेले स्वागताचे फलक तसेच ठिकठिकाणी मुंबई परिसरात सुरू असलेल्या जागतिक दर्जाच्या परिषदा यात आज मुंबईकर मॅक्रॉन यांना शोधत होते.

मॅक्रॉन यांनी मुंबईचा फेरफटका सुरू केला. या रस्त्यांवर त्यांनी केलेल्या जॉगिंगची अपूर्वाई मुंबईकरांना वाटत होती. नंतर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून मॅक्रॉन यांना मुंबई आणि भारत मनापासून आवडल्याचे टाळ्यांच्या कडकडाटात नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT