Bank Holiday Pudhari Photo
मुंबई

Bank Holiday: जून महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार!

राष्ट्रीय, प्रादेशिक, धार्मिक सणांसह शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक सुट्ट्यांमुळे जून महिन्यात देशभरातील बँका एकूण 11 दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये नमूद केलेल्या दिवशी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील शाखांमधील बँकिंग कामकाज बंद राहील. ग्राहक सुट्ट्यांमध्येही डिजिटल बँकिंग सेवा वापरू शकतात. मात्र त्यांना थेट शाखांमध्ये जाऊन बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत.

15 जून रोजी आयझॉलमध्ये यंग मिझो असोसिएशनच्या स्थापनेनिमित्त बँका बंद राहतील. राजा संक्रांतीनिमित्त भुवनेश्वरमध्येही त्याच दिवशी बँका बंद राहतील.

25 जून रोजी मोहरमनिमित्त विजयवाडा येथे बँका बंद राहतील. 26 जून रोजी मोहरमनिमित्त आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, बंगळूर, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँकिंग कामकाज बंद राहील.

29 जून रोजी संत गुरु कबीर जयंती साजरी करण्यासाठी शिमला येथे बँका बंद राहतील, तर 30 जून रोजी ‌‘रेमना नी‌’ नावाची प्रादेशिक सार्वजनिक सुट्टी पाळण्यासाठी आयझॉल येथेबँका बंद राहतील.

शनिवार-रविवारच्या सुट्ट्या

या महिन्यात चार रविवार आहेत. त्यामुळे बँका 7, 14, 21 आणि 28 जून रोजी बंद राहतील. रविवार व्यतिरिक्त बँका 13 जून (दुसरा शनिवार) आणि 27 जून (चौथा शनिवार) रोजी देखील बंद राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT