accident file photo
मुंबई

Jogeshwari Accident: जेव्हीएलआर मार्ग की मृत्यूचा महामार्ग? एकाच रात्री अवघ्या काही अंतरावर दोन भीषण अपघात; दोघांचा जागीच करुण अंत

शामनगर तलावाजवळ मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी दुचाकी घसरली; मागून आलेल्या डंपरची धडक

पुढारी वृत्तसेवा

जोगेश्वरी: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पुन्हा एकदा एकाच रात्री अवघ्या काही अंतरावर घडलेल्या दोन भीषण अपघातात दोन जोगेश्वरीकर तरुण आणि तरुणीचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली.

जोगेश्वरी पूर्व मजास गाव टेकडी परिसरातील रहिवाशी असलेला संदेश सुरेश कालेकर (वय ३६) हा तरुण आपल्या दुचाकीवरून घाटकोपरला पत्नीला भेटायला गेला होता.

परत येत असतानाच जे.व्ही.एल.आर. वरील शामनगर तलाव जवळ मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक संदेश यांची दुचाकी घसरली आणि त्याच क्षणी मागून प्रचंड वेगाने आलेल्या डंपरने त्याला उडवले.

डंपरचे चाक संदेशच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात डॉक्टरांनी संदेशला मृत घोषित केले. पोलिसांनी फरार डंपरचालकाचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

या अपघातानंतर काही मिनिटांनी पुन्हा जेव्हीएलआर मार्गाच्या मुख्य मार्गावर पुलाखालून रस्ता ओलांडत असलेली सुमन यंगटा शिरकुल (वय ३०) ही तरुणी भरधाव जाणाऱ्या एका मोठ्या वाहनाच्या चाकाखाली आली. सुमनचा जागीच अंत झाला.

एकाच रात्री अवघ्या काही तासांत दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जे.व्ही.एल.आर. वर अपघातांची मालिका नवी नसून, हा मार्ग वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT