मुंबई : पुढारी वृत्तसेवा
कलेच्या क्षेत्रात देशभरात लौकिक मिळविलेल्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आता संशोधनासाठीही विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. संस्थेच्या १६९ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, पहिल्या प्रवेश प्रक्रियेत १६ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या जागांसाठी आतापर्यंत ८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये कला विषयाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. डिसेंबरमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून संशोधन अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टला ऑक्टोबर २०२३ मध्ये 'डी नोव्हो' श्रेणीत अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराला चालना मिळाली. या दर्जामुळे विशेष ज्ञानक्षेत्रांमध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी वास्तुकलेसाठी आठ अर्ज पहिल्या प्रवेश प्रक्रियेत कला विषयाच्या सहा जागांसाठी ४३ अर्ज आले आहेत. रचना विषयाच्या सहा जागांसाठी सुमारे ३७, तर वास्तुकला विषयाच्या चार जागांसाठी आठ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी आवश्यक असेल. आगामी काळात संशोधन मार्गदर्शक आणि शिक्षकांची उपलब्धता वाढवून पीएचडीच्या जागाही वाढविण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.
त्यानुसार कला शिक्षणाबरोबरच संशोधनाला प्राधान्य देत पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या तीन संस्थांना एकत्रित शैक्षणिक चौकट मिळाली आहे. त्यामुळे कला, उपयोजित कला आणि वास्तुकला या क्षेत्रांतील संशोधनाला संस्थात्मक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
पीएचडी प्रवेशासाठी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने २९ ऑक्टोबरच्या बैठकीत प्रवेश नियमांना मान्यता दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवेश आणि संशोधन प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या वर्षी मर्यादित जागांवर प्रवेश देऊन संशोधक विद्यार्थ्यांना पुरेसे मार्गदर्शन आणि आवश्यक संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली आहे.
वास्तुकलेसाठी आठ अर्ज
पहिल्या प्रवेश प्रक्रियेत कला विषयाच्या सहा जागांसाठी ४३ अर्ज आले आहेत. रचना विषयाच्या सहा जागांसाठी सुमारे ३७, तर वास्तुकला विषयाच्या चार जागांसाठी आठ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी आवश्यक असेल. आगामी काळात संशोधन मार्गदर्शक आणि शिक्षकांची उपलब्धता वाढवून पीएचडीच्या जागाही वाढविण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.