मुंबई : दहावीत 95 टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या 26 विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले 567 विद्यार्थी यादीत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात आयटीआयकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट होते.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने 1 लाख 73 हजार 673 विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय व खासगी आयटीआयमधील विविध ट्रेड्समध्ये होणार आहेत. यादीनुसार 80 ते 90 टक्के गुण मिळवलेले 3 हजार 245 विद्यार्थी, तर 70 ते 80 टक्के गुण गटातील विद्यार्थी 51,967 इतके आहेत. 70 टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्यांची संख्या सर्वाधिक असून यामध्येही स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
95 हून अधिक - 26
95 ते 90 - 541
90 ते 85 - 3,245
85 ते 80 - 8,174
80 ते 75 - 13,845
75 ते 70 - 19,234
70 ते 65 - 23,559
65 ते 60 - 25,162
60 ते 55 24,594
55 ते 50 - 21,662
50 ते 45 - 17,110
45 ते 40 - 11,479
40 पेक्षा कमी - 5,042
एकूण विद्यार्थी - 1,73,673
आयटीआयकडे आता 95 हून अधिक टक्के गुण मिळवणार्यांचाही कल दिसत आहे. पदवी शिक्षणाऐवजी तांत्रिक कौशल्यांवर भर देणारी धोरणे यामुळे गुणवंत विद्यार्थी प्रवेश घेत आहेत . आता प्रवेशाची पहिली यादी 7 जुलै, सायं. 5 वाजता जाहीर होईल, यानंतर प्रत्यक्ष प्रवेश 8 ते 12 जुलै या काळात होणार आहे, यानंतर दुसरी प्रवेश फेरी : 27 ते 22 जुलै या काळात राबवली जाणार आहे.