आईस्क्रिममधील बोट कर्मचाऱ्याचेच असल्याचे डीएनए रिपोर्टवरून स्पष्ट File photo
मुंबई

Mumbai| आईस्क्रिममधील बोट कर्मचाऱ्याचेच असल्याचे डीएनए रिपोर्टवरून स्पष्ट

पार्सल मागविलेल्या आईस्क्रिमच्या पाकिटात सापडलेले ते बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचे उघडकीस आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पार्सल मागविलेल्या आईस्क्रिमच्या पाकिटात सापडलेले ते बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचे उघडकीस आले आहे. डीएनए रिपोर्ट मालाड पोलिसांना प्राप्त झाला असून या रिपोर्टवरुन ते बोट कर्मचाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मालाड येथे राहणारा ब्रेंडन ऍटिक्स फेरॉव हा तक्रारदार तरुण डॉक्टर विलेपार्ले येथील एका खाजगी रुग्णालयात काम करतो. १२ जूनला त्याची बहिण जेसिकाने झेप्टो या ऑनलाईन अॅपवरुन एक किलो बेसन, तीन युम्मो मॅगो आईस्क्रिमची ऑर्डर केली होती.

रात्री जेप्टो कंपनीचा प्रतिनिधी ऑर्डर घेऊन त्यांच्या घरी आला. त्याने बेसनसोबत दोन मँगो कोन आईस्क्रिम आणि एक युममो बटरस्कॉच कोन आईस्क्रिम आणले होते. जेवण झाल्यानंतर रात्री सर्वजण आईस्क्रिम खात असताना त्याच्या तोंडामध्ये आलेला तुकडा त्याने तोंडातून हातात घेतला. तो नख असलेला मांसाचा तुकडा होता.. त्याने सोशल

मिडीयावरुन युममो आईस्क्रिम कंपनीच्या पेजवर तक्रार केली असता कंपनीच्या कस्टमर केअरमधून त्याला कॉल आला. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर या कर्मचाऱ्याने त्याला आईस्क्रिमवरील कंपनीच्या छापील माहितीचा फोटो आणि ऑर्डर डिटेल्स पाठविण्यास सांगितले. ती माहिती त्याने पाठवून दिली होती.

दहा मिनिटांनी या कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा कॉल करुन त्याच्या तक्रारीची माहिती काढण्याचे काम सुरु असून लवकरच तुम्हाला माहिती दिली जाईल असे सांगितले. नंतर मात्र काही प्रतिसाद आला नाही.

हे आईस्क्रिम पुण्याच्या एका फॅक्टरीत तयार केले

डॉक्टरने मग नख असलेला मांसाचा तुकडा आईस बॅगमध्ये ठेवून मालाड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हे आईस्क्रिम पुण्याच्या एका फॅक्टरीत तयार करण्यात आले होते. आईस्क्रिम पॅक करताना एका कर्मचाऱ्याच्या हाताला अपघात होवून त्याच्या बोटाचा तुकडा आईस्क्रिममध्ये पडला होता.

ते बोट तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून या कर्मचाऱ्याची डीएनए चाचणी करण्यात आली असता ते बोट याच कर्मचाऱ्याचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा कर्मचारी तिथे फ्रुट रिडर मशिनमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतो. ते बोट किती दिवसांपूर्वी कापले गेले होते हे आता फॉरेन्सिक रिपोर्टवरुन स्पष्ट होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT