प्रतीकात्मक छायाचित्र. file photo.
मुंबई

IPL 2026 Shocker |धक्‍कादायक..! BCCI ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

मृत मूळचे ब्रिटनचे नागरिक, शवविच्छेदन अहवालानंतरच स्‍पष्‍ट हेणार मृत्‍यूचे कारण

पुढारी वृत्तसेवा

IPL 2026 Shocker

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आयपीएल २०२६ हंगामाच्‍या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएल सामन्यांच्या कव्हरेजसाठी बीसीसीआयसोबत (BCCI) ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एका ब्रिटीश नागरिकाचा मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडंट हॉटेलमधील खोलीत मृत्यू झाला आहे. इयान विल्यम्स लँगफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे ब्रिटनचे रहिवासी होते.

मुंबईतील हॉटेलमध्ये २४ मार्चपासून होते मुक्कामाला

इयान २४ मार्चपासून मुंबईतील नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. आयपीएल सामन्यांच्या तांत्रिक कव्हरेजची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. २९ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला होता. या सामन्‍यानंतर इयान रात्री उशिरा आपल्या खोली क्रमांक २७१५ मध्ये परतले होते.

मास्टर कीने उघडला दरवाजा

सकाळच्या सुमारास हॉटेल रिसेप्शनवरून इयान यांच्‍या खोलीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र वारंवार कॉल करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेल कर्मचार्‍याने 'मास्टर की'च्या साहाय्याने दरवाजा उघडला असता, इयान हे जमिनीवर मृतावस्थेत पडलेले आढळले.तातडीने हॉटेलमधील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र तपासणीअंती त्यांनी इयान यांना मृत घोषित करण्‍यात आले.

अपघाती मृत्‍यूची नोंद

या घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT