मुंबई : ऐतिहासिक वारसा असलेल्या 'केशवराव भोसले नाट्यगृहाला काल मोठी आग लागली. यात या वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूला आगीची झळ पोहचल्याने या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ऐतिहासिक परंपरा लाभलेलं 'केशवराव भोसले नाट्यगृहाला काल भयंकर मोठी आग लागली. कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा असा राख होताना बघणे हे भावनेला धक्का लागणारे आहे. या आगीत नाट्यगृहाचे मौल्यवान गोष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढले पाहिजे. तसेच कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.