Rupee vs Dollar Pudhari
मुंबई

Rupee vs Dollar: रुपयाची घसरगुंडी सुरुच... डॉलर ९६ च्या पुढे; आणखी किती घसरणार? जाणून घ्या घसरणीचं कारण

शुक्रवारच्या (दि. 15) सत्रात प्रथमच एका डॉलरच्या भावाने 96 रुपयांच्या पलीकडे झेप घेतली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शेअर बाजारातून विदेशी संस्थांनी काढून घेतलेली गुंतवणूक, कच्च्या तेलाच्या भावात झालेली वाढ, यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. शुक्रवारच्या (दि. 15) सत्रात प्रथमच एका डॉलरच्या भावाने 96 रुपयांच्या पलीकडे झेप घेतली.

बाजार बंद होताना डॉलरचा भाव 95.96 रुपयांवर बंद झाला. हा रुपयाचा आतापर्यंतचा नीचांक आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव तीन टक्क्यांनी वाढून 108.80 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेला.

तर, यूएस डब्ल्यूटीआयचा भाव 3.52 टक्क्यांनी वाढून 104.7 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेला. याचा रुपयावरील दबाव वाढला आहे. विदेशी चलन बाजारात एका डॉलरचा भाव 95.86 रुपयांनी सुरू झाला. त्यानंतर दिवसभर झालेल्या व्यवहारात हा दर 96.14 या उच्चांकावर गेला होता. गुरुवारच्या तुलनेत रुपयात तब्बल 50 पैशांची घसरण झाली होती. अखेरीस बाजार बंद होताना एका डॉलरचा भाव 95.96 रुपयांवर बंद झाला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT