India First Offshore Airport pudhari
मुंबई

India First Offshore Airport: भारतातील पहिले 'ऑफशोर' विमानतळावर पालघरला; मुख्यमंत्री फडणवीसांनी DPR चे दिले आदेश

Anirudha Sankpal

India First Offshore Airport: भारतातील पहिला ऑफशोर एअरपोर्ट महाराष्ट्रात होणार आहे. हा देशातील महत्वकांक्षी प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा म्हणून ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रोजेक्टबाबत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तन विरार सागरी सेतू काशा प्रकारे या प्रोजेक्टला थेट कनेक्टिव्हिटी देऊ शकतो याची देखील चाचपणी करण्याचा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ऑफशोर विमानतळ म्हणजे काय?

पारंपरिक एअरपोर्ट हा पूर्णपणे जमिनीवर तयार केला जातो. मात्र ऑफशोर एअरपोर्ट हा समुद्रकाठालगतची जमीन किंवा समुद्रात पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेल्या बेटावर हे विमानतळ तयार केलं जातं. या प्रकारचे विमानतळ हे जपान, हाँगकाँग आणि साऊथ कोरियात यशस्वीरित्या तयार करण्यात आले आहेत. त्यांनी या याद्वारे मोठे एव्हिएशन हब तयार केलं आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीकोणातून बघायचं झालं तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात अजून एक विमानतळ यापेक्षा खूप महत्वाचा आहे. वाढवण बंदर, वेगवान रेल्वे मार्ग आणि नवीन रोड लिंक याचबरोबर आता हे प्रस्तावित ऑफशोर विमानतळ मुंबईच्या भागातील आर्थिक विकासाचा नवा चेहरा ठरणार आहेत. पालघरमध्ये देखील नवीन गुंतवणूक होत आहे. त्यामुळं मुंबईच्या उत्तर भागात नवीन विकासाचा कॉरिडोर तयार होणार आहे.

अर्थव्यवस्थेला कसा बूस्ट मिळणार?

देशातील पहिले ऑफशोर विमानतळ हे पालघर जिल्ह्यातील कोरे बीचजवळ तयार करण्यात येणार आहे असा अंदाज आहे. हे विमानतळ वर्षाला ९० मिलियन प्रवाशांची ये-जा करता येईल अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे. हे विमानतळ वाढवण बंदर, मेजर ट्रान्सपोर्ट लिंक या मोठ्या प्रोजेक्टच्या जवळच असणार आहे. एकत्रितपणे ते या भागाचा कायपालट करू शकतात. हा मुंबईच्या शहरीकरणाचा एकप्रकारे विस्तारच असणार आहे.

डेव्हलपर्ससाठी ही घोषणा म्हणजे एक टर्निंग पॉईंटच आहे. नवाणे ग्रुपचे संचालक श्रवण नवाणे यांच्या मते, 'या भागात दशकापासून काम करणाऱ्या विकासक तुम्हाला सांगतील की पायभूत सुविधांचा विकास होणार आहे हे त्यांना माहिती होतं. मात्र तो कधी येणार हा मोठा प्रश्न आहे.'

श्रवण यांच्या मते मोठ्या सार्वजनिक संस्था या स्वतंत्ररित्या या ग्रोथ कॉरिडोअरला पाठिंबा देत आहेत. त्यांनी या भागातील लोकांमध्ये दीर्घकालीन विकासाबाबत एक विश्वास निर्माण केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT