मुंबई

डोंबिवली : अवैध हत्‍यार बाळगणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

निलेश पोतदार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : खडकपाडा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शहाड येथील मोहने परिसरात अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान कल्याण मध्ये राहणाऱ्या या आरोपींकडून दोन कोयते एक पिस्तुल सारखे दिसणारे राखाडी रंगाचे लायटर अशी हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, कल्याण येथे वास्तव्यास असणारा आणि कापडाचा व्यवसाय करणारा मोहम्मद गौस शेख (वय ३५) तसेच मुसेब शेख (२५) आणि त्या दोघांचे इतर दोन साथीदार रात्री २ वाजता शहाड येथील मोहने परिसरातील बदंरपाडा येथील सार्वजनिक रस्त्यावर हात्यारांसह उभे होते. यावेळी पेट्रोलिंग करत असणारे खडकपाडा येथील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार आणि त्यांच्या समवेत असणारे पोलीस हवालदार तडवी यांना काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात आले.

त्यांनतर या इसमांनी चौकशी केली असता, अवैधरित्या हत्यार बाळगल्याचे समोर आले आहे. या आरोपींवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT