हॉटेल बंदचा फटका; एपीएमसीत रोजचा 100 ते 120 गाडी भाजीपाला पडून  pudhari photo
मुंबई

lpg crisis impact on apmc market: हॉटेल बंदचा फटका; नवी मुंबई एपीएमसीत रोजचा 100 ते 120 गाडी भाजीपाला पडून, दर गडगडले

Navi Mumbai Apmc Market: हॉटेल व्यावसायिकांनी केली भाजीपाला खरेदी बंद; भाज्यांचे दर निम्म्यावर; आवक दोनशे गाड्यांनी घटली

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai Apmc Market lpg crisis impact

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

गॅसपुरवठा होत नसल्याने मुंबईतील हॉटेल्सना मोठा फटका बसला, काहींनी शटर बंद केले, काहींनी पदार्थ कमी केले, काहींनी वेळा घटवल्या. परिणामी, भाजीपाल्याची गरजही कमी झाली. या हॉटेल्सचालकांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरवल्याने सरसकट सर्वच भाज्यांचे दर 50 ते 60 टक्क्यांनी घसरले.सातशे गाड्यांची आवक पाचशेवर आली आणि आलेल्या मालाला उठाव नसल्याचे घाऊक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी पुढारीला सांगितले.

एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर कोलमडले असून निम्म्यावर आली आहेत. सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांसह पाव भाजी सेंटर, झोमॅटो,घरगुती खानावळ, पोळी भाजी केंद्र, चायनीज, बर्गर आदी व्यवसायावर झाला आहे. अनेक मोठे हॉटेल आणि इतर व्यावसायिक एपीएमसीतून 100 ते 120 गाडी भाजीपाला ऑनलाईन खरेदी करत होते.

काही खरेदीवर प्रत्यक्ष बाजारात येऊन भाजीपाला खरेदी करत होते. मात्र सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने त्याचा परिणाम थेट एपीएमसीत घाऊक भाजीपाला बाजारावर झाला आहे. हॉटेल्स आणि हॉटेलला लागणारा भाजीपाला विकला जात नसल्याने हा भाजीपाला पूर्णपणे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पडून असल्याचे चित्र आहे. भाज्यांचे दर तब्बल 50 ते 60 टक्क्यांनी खाली उतरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT