GT Hospital MRI service Pudhari
मुंबई

GT Hospital MRI service: जीटी रुग्णालयातील कोट्यवधींची एमआरआय सेवा 8 महिन्यांपासून ठप्प; रुग्णांना खासगी केंद्रांचा आधार

डिसेंबर 2025 मध्ये उद्घाटनानंतरही देयकाअभावी मशीन बंद; हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य शासनाच्या जीटी रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली एमआरआय सुविधा आठ महिन्यांपासून धूळखात पडून आहे. नवीन मशीनचे डिसेंबर 2025 मध्ये उद्घाटन करण्यात आले असले तरी कंत्राटदाराला देयके न मिळाल्याने रुग्णांना या अत्यावश्यक सेवेचा लाभ मिळू शकलेला नाही. या प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका थेट रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे.

एमआरआय सेवा ठप्प झाल्यामुळे केवळ रुग्णांचे हाल होत नाहीत तर डॉक्टरांनाही गंभीर आजारांचे अचूक आणि वेळेवर निदान करणे कठीण बनले आहे. रुग्णांना त्यांच्या तपासण्या बाहेर खासगी केंद्रात कराव्या लागत असून एका चाचणीसाठी हजारो रुपयांचा खर्च येत आहे.

आठ महिन्यांपूर्वीच ही मशिन रूग्णालयात आणण्यात आली आहे. नियमानुसार मशीन कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीला 80 टक्के रक्कम देणे अपेक्षित होते, तर उर्वरित 20 टक्के रक्कम ठराविक प्रक्रियेनंतर अदा करायची होती. मात्र प्रशासकीय प्रक्रियेत विलंब झाल्याने वेळेत देयक न झाल्यामुळे कंपनीने मशीनचे कामच बंद केले आहे. परिणामी जून 2025 पासून जीटी हॉस्पिटलमधील एमआरआय चाचणी पूर्णपणे बंद आहे.

देयकाचा निर्णय संबंधित सरकारी विभागाकडे प्रलंबित आहे. विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ड्युअल-चॅनेल एमआरआय सेवा कार्यान्वित होईल अशी आशा आहे.
डॉ. जितेंद्र देशमुख, अधिष्ठाता, जीटी रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT