मुंबई: किंग्ज सर्कल, माटुंगा येथील जीएसबी (गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळाचा महागणपती हा मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या एक आहे. मंडळाची स्थापना १९५१ मध्ये झाली. मंडळाचा भर केवळ गणेशोत्सवावर नसून अन्नदान, सामाजिक सेवा, शैक्षणिक मदत आणि गरजूंसाठी आर्थिक मदत यावरही आहे.
यंदा गणेश मूर्तीला ६६ किलो सोने आणि ३३५ किलो चांदी अशा ४०१ किलो दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. शनिवारी महाणपतीची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली. जाणून घेऊया महागणपतीचे वैभव...
अन्नदानाची मोठी परंपरा
जीएसबीचा गणेशोत्सव हा दागिन्यांइतकाच सेवेसाठीही प्रसिद्ध आहे. यंदा मंडळाच्या अन्नदान सेवेतून दररोज ४० हजारांहून अधिक भाविकांना प्रसाद भोजन देण्याचे नियोजन आहे. पाच दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविकांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
७०३.२७ कोटींचा विमा! २०२६ मध्ये जीएसबी सेवा मंडळाने ७०३.२७ कोटींचे विमा संरक्षण घेतले आहे. यात मूर्तीवरील मौल्यवान दागिने, मंडप, मंडळाची मालमत्ता व इतर गोष्टी समाविष्ट २०२५ मध्ये मंडळाचे विमा संरक्षण सुमारे ४७४ कोटी रुपये इतके होते जीएसबी महागणपतीला ‘मुंबईचा सर्वात श्रीमंत गणपती’ असे संबोधले जाते.
२०२५ मधील दागिने
६९ किलो सोने, ३३६ किलो चांदी
२०२६ मधील दागिने
६६ किलो सोने ३३५ किलो चांद