Dahihandi Thane Anisha Shinde, Pudhari
मुंबई

Dahi Handi Festival 2025: राज्यभरात ढाक्कुमाक्कुम, ठाण्यात 9 थरांची सलामी; 10 थरांचा विक्रम कोण मोडणार?

Dahi Handi Festival Mumbai Pune 2025: यंदा दहा थरांचा कोण विक्रम करणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Dahi Handi Festival 2025 Mumbai Thane Navi Mumbai:

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरांत लाखोंची बक्षिसे लावलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील जय जवान, ताडवाडी गोविंदा पथकांसह हजारो गोविंदा पथक सज्ज झाली. यंदा दहा थरांचा कोण विक्रम करणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 'गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात शनिवारी सकाळपासून पाहायला मिळत आहे.

मुंबईत दहीहंडी उत्सवाला राजकीय स्वरूप आले आहे. शहर व उपनगरात भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्यावतीने मोठ्या दहीहंडींचे आयोजन केले असून लाखोंची बक्षीसे लावली आहेत. या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथके महिनाभरापासून सराव करीत आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढ पहावयास मिळणार आहे. लहान गोविंदा पथकही जास्तीत जास्त थर लावण्याचा यंदाही प्रयत्न करणार आहेत.

आतापर्यंत मुंबईत 9 थरांचा विक्रम जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने केला असून यंदा हे पथक दहा थर लावणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. दहीहंडी फोडण्यासाठी शुक्रवारी मुंबईत अनेक ठिकाणी गोविंदा पथकाच्या रंगीत तालीमही झाल्या.

गेल्या काही वर्षांपासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा सुरू झाल्या आहेत. किंग्ज सर्कल येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध दहीहंडी उत्सवांपैकी एक आहे. त्यामुळे या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होतात.

दादर येथे गोविंदा पथकांची जोरदार स्पर्धा आणि प्रचंड गर्दी अनुभवायला मिळेल. लालबाग परिसर दहीहंडी उत्सवासाठी देखील खूप लोकप्रिय आहे. येथे बाल गोपाल मित्र मंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. घाटकोपरमध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव मंडळ, विलेपार्ले आणि लोअर परेल येथे अनेक दहीहंडी बांधल्या जातात. वरळी येथील जांबोरी मैदान हे मुंबईत सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी प्रसिद्ध आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीही उत्साहात साजरी

जुहूच्या हरे राम हरे कृष्ण मंदिरासह सर्व उपनगरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांच्या घरोघरीही जन्माष्टमी साजरी करण्यात आली.

  • शिवसेना ठाकरे गट व भाजपच्यावतीने दादर परिसरामध्ये दहीहंडी उभारण्यात आली असून यातही लाखोंची बक्षीस आहेत.

  • माटुंग्यात शिवसेना दोन्ही गटांकडून लाखो रुपयांच्या दहीहंड्या.

  • घाटकोपरला आ. राम कदम यांची दहीहंडी

  • विक्रोळीत मनसे आणि शिवसेना यांच्यावतीने लाखो रुपयांचे बक्षीसे.

  • अंधेरीत भाजपकडून आणि शिवसेनेकडून दहीहंडीत लाखोंची बक्षीसे.

  • बोरिवली मागाठाणे प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी, लाखो रुपयांची बक्षीस आणि विविध सेलिब्रिटी हजेरी लावणार.

यंदा सुरक्षिततेला विशेष महत्त्व

दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर रचण्यात येतात यावेळी मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. यात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. त्यामुळे यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष देण्यात आले आहे. सर्व गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी किट, मॅट आणि जॅकेट वापरणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय गोविंदा पथकांचा विमाही उतरवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

मुंबईचा ठाण्यातील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे सहभागी झाले.

दहीहंडी अपडेट्स

> गोकुळ हंडीला किसन नगरचा राजा गोविंदा पथकांची ८ थरांची सलामी

> 21 वेळा 9 थर लावण्याचा विक्रम मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने केला होता. यावर्षी आपलाच विक्रम मोडीत काढण्यासाठी हे गोविंदा सज्ज झाले आहेत.

> नालासोपारा येथील शिव गणेश मंडळाने मागाठाणे येथे लावले आठ थर

> दादर येथील आयडलजवळील दहीहंडीत उत्साह जल्लोष सुरू आहे. महिला पुरुष आणि सेलिब्रिटी दहीहंडी तर आहेच. मुंबईतले पहिलं दृषीहीन गोविंदा पथक ही पोहचले. त्यांनी ही ४ थर लावण्याची प्रयत्न केले

> कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यातील वर्तकनगर प्रतिष्ठानच्या दहीहंडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT