मुंबई

Mumbai 26/11 : २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT