Goregaon West Road Closure Pudhari
मुंबई

Goregaon West Road Closure: गोरेगावमध्ये वाहतुकीवर पोलिसांकडून निर्बंध; कोस्टल रोडच्या कामासाठी स्लिप रोड पूर्णपणे बंद

वीर सावरकर उड्डाणपुलाजवळील रस्ता बंद ठेवणार; कोस्टल रोड प्रकल्पाच्या नॉर्थ पॅकेज बी अंतर्गत खांब उभारणीचे काम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपुलाजवळील एका महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतुकीसाठी महिनाभर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

कोस्टल रोड प्रकल्पात नॉर्थ पॅकेज बी च्या खांब उभारणीच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक - पश्चिम उपनगर) अजित बोऱ्हाडे यांनी शुक्रवार जारी केलेल्या अधिसूचनेनंतर हे तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार गोरेगाव पश्चिमेकडील वीर सावरकर उड्डाणपुलाजवळील एका महत्त्वाच्या रस्त्यावर खांबांचे काम सुरू करण्यात येत आहे.

त्यामुळे वासरी हिल जंक्शनकडून एस. व्ही. रोडवरील एमटीएनएल जंक्शनकडे जाणारा स्लिप रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा स्लिप रोड ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बंद राहणार आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

एमटीएनएल जंक्शन किंवा एसव्ही रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ईझी-झोन मॉलजवळ वसारी हिल जंक्शनवर डावीकडे वळावे. त्यानंतर त्यांनी डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूल ओलांडून सुंदर नगर रस्त्याने पुढे जाता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT