मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गुगल यांनी गुरुवारी एका महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या अंतर्गत दोन्ही कंपन्या मिळून भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रसार वेगाने वाढवणार आहेत. या भागीदारीचे मुख्य आकर्षण म्हणजे जिओच्या ग्राहकांना गुगलकडून 35,100 रुपये किमतीचा 18 महिन्यांसाठी गुगल एआय प्रोचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे.
या प्लॅनअंतर्गत वापरकर्त्यांना 2.5 , नवीनतम आणि 3.1 मॉडेल्सचा वापर करून अधिक प्रभावी प्रतिमा आणि व्हिडीओ तयार करण्याची सुविधा मिळेल. शिक्षण आणि संशोधनासाठीचा विस्तारित वापर आणि 2 क्लाउड स्टोरेजसारख्या प्रीमियम सेवादेखील या ऑफरमध्ये समाविष्ट आहेत.
सुरुवातीला ही सुविधा 18 ते 25 वयोगटातील जिओ ग्राहकांसाठी खुली राहील आणि पुढील टप्प्यात सर्व जिओ वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. ही सेवा केवळ 5 जी अनलिमिटेड प्लॅन असलेल्या जिओ ग्राहकांसाठी लागू असेल. रिलायन्सच्या रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड या सहाय्यक कंपनीने गुगलच्या सहकार्याने ही विशेष सेवा तयार केली आहे.
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, “आमचं ध्येय 1.45 अब्ज भारतीयांपर्यंत सेवा पोहोचवणे. असून, गुगलसारख्या दीर्घकालीन भागीदारांसोबत आम्ही भारताला सक्षमच नाही, तर समर्थ बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
गुगल आणि अल्फाबेटचे सुंदर पिचाई म्हणाले, “रिलायन्स आमच्यासाठी भारताच्या डिजिटल भविष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. आता आम्ही ही भागीदारी नव्या युगात घेऊन जात आहोत. भारताला जागतिक स्तरावरचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी, रिलायन्स आणि गुगल मिळून देशातील कंपन्यांना अत्याधुनिक हार्डवेअरपर्यंत प्रवेश देणार आहेत. यामुळे भारतीय उद्योगांना मोठे आणि गुंतागुंतीचे मॉडेल विकसित करण्यात मदत होईल.