मुंबई : गिरगावातील जुन्या-नव्या अमृतवाडीतील चाळींचा पुर्नविकास झाला. त्यामुळे साडेतीनशे रहिवाशांना टॉवरमध्ये आलिशान घरे मिळाली आहेत. सरस्वतीच्या आशीर्वादानेच चांगले घर मिळाल्याची भावना अमृतवाडीतील चाळीतील रहिवाशांनी व्यक्त केली.
अमृतवाडीतील चाळींमध्ये असंख्य 10 दशकांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करत होती. कालांतराने एका विकासकाने चाळीचा पुनर्विकास हाती घेतला होता. दोन-तीन वर्ष काम सुरू असताना अचानक मध्येच कोरोना उद्भवल्याने टॉवरचे काम बंद पडलेे. त्यामुळे रहिवाशांची चिंता वाढू लागली होती. घर मिळेल का नाही या चिंतेने रहिवासी ग्रस्त होते. परंतु त्यावेळी रहिवाशांनी सरस्वती मातेचा धावा केला आणि बंद पडलेले काम काही दिवसांतच सुरू झाल्याची बातमी समजली आणि 22 मजल्यांचे दोन टॉवर उभे राहिले.
येथेच 350 रहिवाशांना पूर्वीपेक्षा मोठी आणि आलिशान घरे मिळाली. सरस्वतीच्या आशीर्वादाने आमच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना अमृतवाडीतल्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवासी श्रीकांत पंगेरकर यांनी सांगितले की, दसर्याच्या दुसर्या दिवशीच इतर देवीप्रमाणेच देवीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन केले जाते.
100 वर्षांपूर्वी सरस्वती मातेची स्थापना
गिरगावातील एसव्हीपी मार्गावर जुन्या-नव्या अमृतवाडीतील रहिवाशांना एकत्र आणण्यासाठी पटांगणात 100 वर्षांपूर्वी शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दसर्याच्या मुहूर्तावर सरस्वती मातेची स्थापना करण्यात आली होती. आज त्याला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीदेखील आताची तरुण पिढी एकत्र मिळू पूर्वीपेक्षाही मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करत आहे.