Ghatkopar Skywalk Baby Death Case file photo
मुंबई

Mumbai Crime : स्कायवॉकवरून फेकलेल्या मुलाचा मृत्यू

आरोपीवर हत्येचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : घाटकोपरमध्ये रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या स्कायवॉकवरुन ९ महिन्यांच्या चिमुरड्याला वडिलांनीच खाली फेकल्याची धक्कादायक घटना ही घटना रविवारी रात्री घडली. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात वडिलांनी ९ महिन्याच्या बाळाला खाली फेकले. मंगळवारी सकाळी सायन रुग्णालयात उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला.

आरव शेख (९ महिने) असे यातील मयत मुलाचे नाव असून तो आई आरती शेख (२२) आणि वडील जाफर शेख (२३) यांच्यासोबत घाटकोपरच्या सर्वोदय नगर परिसरात राहत होता. आरोपी जाफर शेख हा घाटकोपर परिसरातच कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. मात्र काही महिन्यांपासून त्याला अमली पदार्थाचे सेवन करण्याचे व्यसन लागले आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.

रविवारी सकाळी या दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रात्री दोघेही घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात असताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपी जाफर शेख याने आरवला त्याच्या आईच्या हातातून हिसकावून घेतले. त्यानंतर तो त्याला घेऊन तिथून जात असताना त्याच्या आईने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी रागाच्या भरात आरोपीने मुलाला स्कायवॉकवरून खाली फेकले.

गस्तीवर असलेल्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांनी तत्काळ या मुलाला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्यामुळे बाळाला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले होते.

याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे. घाटकोपर पोलिसांना याप्रकरणी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT