मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026’ चा भाग असलेल्या ‘इनोव्हेशन 2026’ उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी गेट वे च्या ऐतिहासिक वास्तूवर अवघ्या 3.45 मिनिटांच्या एका डिजिटल लेजर शोने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
भारत आणि फ्रान्सच्या कला, चित्रपट आणि वारसा आदींचे अत्यंत मनोहारी दर्शन या शोच्या निमित्ताने पाहायला मिळाले. मंगळवारी दोन्ही देशांच्या निवडक मान्यवरांसमोर हा शो दाखविण्यात आला. मात्र, लवकरच सर्वसामान्य मुंबईकरांना हा शो दाखवण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
मोदी, मॅक्रॉन यांच्यासह फ्रान्सचे शिष्टमंडळ, राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोन्मेषकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.