Ganpati Special Trains pudhari photo
मुंबई

Ganpati Special Trains 2026: गणपतीसाठी मडगाव व कुर्ला येथून विशेष गाड्या

येत्या १८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर दरम्यान या दोन्ही गाड्या सोडल्या जाणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: येत्या गणपतीसाठी कोकण रेल्वेने चाकरमान्यांसाठी मडगाव जंक्शन वरून दर मंगळवारी नागपूरसाठी आणि दर रविवारी कुर्ला एलटीटी येथून विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. येत्या १८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर दरम्यान या दोन्ही गाड्या सोडल्या जाणार आहेत.

यामध्ये क्र. ०११४० ही विशेष गाडी मडगाव जंक्शनवरून दर मंगळवारी अतिरिक्त गर्दीसाठी 'गणपती विशेष' म्हणून १९ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी २१:२५ वाजता नागपूर जंक्शनला पोहोचेल. तर क्र.०११३९ नागपूर जंक्शन - मडगाव जंक्शन ही विशेष गाडी नागपूरहून दर बुधवारी २३:४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ०५:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

या गाड्या करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ जंक्शन, मलकापूर, अकोला जंक्शन, बडनेरा जंक्शन, धामणगाव, पुलगाव जंक्शन व वर्धा येथे थांबणार आहेत.

मडगाव ते कुर्ला एलटीटी विशेष गाडी

गाडी क्र. ०१००४ ही विशेष गाडी मडगाव जंक्शनवरून दर रविवारी १६ वा. सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ०६:०५ वा. कुर्ला येथे पोहोचेल. तर कुर्ला येथून दर सोमवारी ०७:५० वा. सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी २३:४५ वा. मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT