मुसळधार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणारे वारे यामुळे गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा अर्थात ‘स्टिंग रे’चा वावर वाढला आहे. Pudhari News Network
मुंबई

Ganesh Chaturthi: भाविकांनो काळजी घ्या ! गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश ‘स्टिंग रे’चा धोका

मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये या माशांचा भाविकांना मत्स्यदंश होण्याच धोका

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा अर्थात ‘स्टिंग रे’चा वावर

  • दरवर्षी मुंबईमधील समुद्रकिनार्‍यांवर ब्लू बॉटल दृष्टीस पडतात

  • भाविकांना मत्स्यदंश : काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : गेल्या आठवड्यात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणारे वारे यामुळे गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा अर्थात ‘स्टिंग रे’चा वावर वाढला आहे.

भाविकांना मत्स्यदंश होण्याचा संभाव्य धोका

त्यामुळे गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर येणार्‍या भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले. दरवर्षी मुंबईमधील समुद्रकिनार्‍यांवर ब्लू बॉटल दृष्टीस पडतात. त्यांनी अनेक पर्यटकांना त्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये या माशांचा भाविकांना मत्स्यदंश होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अशी घ्या काळजी...

  • गणेश विसर्जन महानगरपालिकेच्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.

  • विसर्जनादरम्यान भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये. पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

  • मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT