Nilesh Patkar Pudhari
मुंबई

Nilesh Patkar: माजी बेस्ट अधिकारी निलेश पाटकर यांचे दुबईत निधन!

स्वित्झर्लंडहून मुंबईला परतताना हृदयविकाराचा झटका; मालवणीतील निवासस्थानी पार्थिव आणण्याची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

मालाड: बेस्टचे माजी अधिकारी आणि बेस्ट कामगार सेनेचे मानद उपाध्यक्ष निलेश पाटकर यांचे २९ सप्टेंबर रोजी दुबई विमानतळावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पाटकर हे पत्नीसमवेत स्वित्झर्लंड येथे मुलाची भेट घेण्यासाठी गेले होते. स्वित्झर्लंडहून मुंबईकडे परतत असताना दुबई विमानतळावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.

या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यांचा पार्थिव देह लवकरच मुंबईतील मालवणी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

निलेश पाटकर यांच्या निधनाने बेस्ट कामगार क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि परिचितांनी दुःख व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT